SIR व पक्षसंघटनेवर लक्ष देण्याचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांचे आवाहन.
आवाळपूर व तळोधी येथे काँग्रेसची आढावा बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ तालुक्यातील मौजा आवाळपूर आणि तळोधी येथे काँग्रेसची कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत SIR अंतर्गत BLA यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. पक्षाच्या BLA यांनी SIR च्या कामात परिश्रम घेतले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. परंतु आता पुढे अधिक दक्ष राहून पात्र मतदारांची नोंद, आवश्यक दुरुस्त्या आणि संबंधित बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच बूथस्तरापासून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने संपर्क, सक्रिय सहभाग आणि नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन धोटे यांनी केले. स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, गणेश गोडे, शैलेश लोखंडे, मुरलीधर बल्की, वामन मुसळे, राहुल बोढे, मंगेश वडसकर, अभय मुनोत, बंडू सेलुरकर, विजय कोल्हे, कल्पतरू कन्नाके, देवराव ठावरी, सुभाष चौधरी, अशोक मासिरकर, नाना जेणेकर, योगेश गोखरे, अरुण जुमनाके, देविदास नैताम, रवींद्र गोहोकार यांचेसह पदाधिकारी, BLA तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



