श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त श्री प्रभू रामचंद्र क.महाविद्यालयात सद्भावना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री अनिल मुसळे सर यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. समाजहितासाठी राष्ट्रीय एकात्मता, सद्भावणा ची कशी गरज आहे हे विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितले .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री डोंगरे सर व देवतळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण दुर्योधन सर आणि दूमोरे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्योधन सर यांनी केले.
संचालन सौ. नीलिमा हजारे व आभार प्रदर्शन श्री. बोभाटे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पानपट्टे मॅडम ,घुमे मॅडम, मुसळे मॅडम ,बांगडे सर व सातपुते सर यांनी सहकार्य केले. इतरेत्तर कर्मचारी बुरानताई यांचे सुद्धा सहकार्य लाभले.



