ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वनसडी येथे सट्टा-पट्टीचा कथित धुमाकूळ

पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :_ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वनसडी परिसरात सट्टा-पट्टीचा प्रकार जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरातील अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता असून, सट्टा घेणारे व चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वनसडी हे कोरपणा तालुक्यातील गाव असून कोरपणा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील परिसर आहे.

सट्टा-पट्टीचा प्रकार नेमका कुठे आणि कोणाच्या माध्यमातून सुरू आहे, याची पोलिसांनी गोपनीय पद्धतीने चौकशी करून सत्यता तपासावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकाराकडे कोरपणा पोलिसांचे लक्ष कधी जाणार? असा सवालही नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये