वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पो. स्टे रामनगर हद्दीत घरफोडी करणारा आरोपी ताब्यात
१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, रामनगर येथे दिनांक 08.08.2026 रोजी फिर्यादी नामे सौ प्रज्ञा नितीन डांगरे, रा. विक्रम शीला नगर, वर्धा यांनी तक्रार दिली की, फिर्यादी या दिनांक 07.08.26 रोजी सायंकाळी बाहेरगावी गेल्या व दिनांक 08.08.2026 चे सायंकाळी घरी परत आल्या, तेव्हा त्यांना त्यांचे घरातील समोरील दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले दिसले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडून असलेली असले, तेव्हा त्यांनी त्यांचे बेडरूम मध्ये गादीच्या खाली ठेवलेली छोटी पर्स ज्यामध्ये त्यांचे सोन्याचे दागिने, एक चेन, अंगठी मंगळसूत्र व सोन्याचे मनी असे होते. ती पर्स गादीखाली दिसून न आल्याने त्यांनी दिनांक 08.08.26 रोजी त्यांनी वरील दागिने जुमला किंमत 56100/-रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेले, अशा पोलीस स्टेशन, रामनगर येथे दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 717/2026 कलम 305, 331(3), 331(4) भा.न्या.स. अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर होता.
सदर गुन्हयाचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करीत असता, सदर आरोपी शोधकामी वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असता, मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की, सदरचा गुन्हा आकाश देवतळे राहणार तारफैल, वर्धा याने केल्या बाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यास रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन, त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव आकाश रमेश देवतळे, वय 34 वर्ष, राहणार तारफेल, वर्धा असे सांगितले वरून त्यास गुन्हाबाबत सविस्तर विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून सदर गुन्हातील चोरी केलेला मुद्देमाल हा सेलू येथील सोनार दुकानदार नामे स्वप्निल सुरेशराव गजपुरे राहणार सेलू याला विकल्याचे सांगितले वरून, सोनार दुकानदार याचे कडे जाऊन, त्यांना आरोपीस दाखवून विचारपूस केली असता, त्यांनी कबूल केले की, सदर आरोपी कडून काही सोन्याचे दागिने विकत घेतले होते. त्यावरून त्यांना सदरचे दागिने हे चोरीचे असल्याचे सांगितले वरून, सदर सोनार दुकानदार यांनी, सोन्याची दागिने देण्याची तयारी दाखवल्यावरून, सदर सोनार दुकानदार याची कडून 1) 10.800 ग्राम वजनाची सोन्याची लगड किंमत 1,58,436/रुपये, 2) 1.5 ग्राम वजनाचे सोन्याचे मनी किंमत 22,005/रुपये असा एकूण जुमला किंमत 1,80,441/ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन रामनगर यांचे कडे देण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही – मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्षनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उप. निरीक्षक सिनू कुमार बानोत, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, विक्रम काळमेघ, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, रितेश गेटमे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



