ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तलवारीने केक कापणे पडले महागात

वायगांव निपाणी येथील युवकाविरुद्ध देवळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. देवळी पोलिसांनी या प्रकरणी अजय अनंता नागपुरे (वय २२, रा. वायगाव निपाणी, ता. जि. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी अजय नागपुरे याचा वाढदिवस असल्याने त्याने रात्री तलवारीने केक कापला. त्यानंतर तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ तयार करून तो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी तत्काळ दखल घेत अजय नागपुरे याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एक लोखंडी पात्याची तलवार तसेच विक्रीसाठी बाळगून ठेवलेली गावठी दारू असा एकूण १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६५२/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सहायक पोलीस अधीक्षक डॉ. वंदना कारखले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या देखरेखीखाली ठाणेदार संदीप कापडे व देवळी पोलिसांच्या पथकाने केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश बावणे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये