आहार पुरवठा कृतीसंगम कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयातील जिल्हा रुग्णालय, वर्धा अधिनस्त २०० पेक्षा कमी खाटा क्षमतेच्या २ उपजिल्हा (हिंगणघाट, आर्वी) व ८ ग्रामिण रुग्णालय (पुलगांव, भिडी, कारंजा, आष्टी, समुद्रपुर, देवळी वडनेर, सेलु) मध्ये आंतरुग्ण उपचार घेत असतात. अशा रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक, संतुलित व वेळेवर आहार पुरविण्याकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन व कार्यरत असलेल्या तालूक्यातील स्थानिक महिला स्वयं-सहाय्यता गटांमार्फत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये निर्धारित अटी व शर्तीनुसार आहार सेवा उपलब्ध करुन घ्यावयाची आहे.सदर शासकीय रुग्णालयात आहार पुरवठा 200 खाटा असणाऱ्या आहार पुरवठा माहिती कार्यशाळा तसेच इतर योजनेची माहिती मागदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यामध्ये मार्गदर्शन करण्याकरिता मा. श्रीमती. वैशाली रसाळ प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.य.वर्धा, मा. डॉ. राजसिंह पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, वर्धा, मा. डॉ. विद्या पवार निवासी वैद्यकीय अधिकारी(बाह्य संपर्क), मा. डॉ. प्रवीण धमाणे, प्रशांत गावंडे, अधीक्षक, शिल्पा आंबेकर, आहार तज्ञ,नीरज नखाते, जि.अ.व्य. वर्धा, मनीष कावडे जी.व्य. विपणन वर्धा. मार्गदर्शक उपस्थित होते.उपजिल्हा / ग्रामिण रुग्णालयामध्ये आहार सेवा घेण्याकरीता तालूक्यातील स्थानिक महिला स्वयं- सहाय्यता गटांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक महिला स्वयं-सहाय्यता गटांनी अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, वर्धा येथे दिनांक१९/०८/२०२६ ते दिनांक३१/०८/२०२६ (कार्यालयीन वेळेत) पर्यंत सादर यावे.या मुदतीत प्राप्त होणा-या अर्जाचा मागणी करण्यात येणार आहे.या कार्यक्रम करिता जिल्ह्यातील सर्व प्रभाग संघ व्यवस्थापक, 49 प्रभाग संघ 2 पदाधिकारी व इच्छुक गट, यांच्याकरिता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उमेद सर्व वर्धा तालुका कर्मचारी व इतर तालुका कर्मचारी यांचे द्वारे प्रयत्न करण्यात आले.



