श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये *नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदा येथे नशामुक्त भारत अभियानांतर्गत अमली पदार्थ, तंबाखू व विविध व्यसनांपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड मॅडम (पोलिस उप निरीक्षक गडचांदूर, पोलीस स्टेशन) , नांदा गावच्या सरपंच सौ मेघाताई पेंदोर, मेजर वाभिटकर सर मंचावर उपस्थित होते..विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच व्यसनांचे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन करण्यात आले. व्यसन हे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच त्याच्या शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनावरही विपरीत परिणाम करते, त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश देण्यात आला.यावेळी उपस्थित सर्वांनी “नशामुक्त भारत – सशक्त भारत”, “व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार” असा निर्धार करून शपथ देण्यात आली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. निता मुसळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद वाघाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

