गडचांदूर येथील पी एम श्री शाळेलाला डायटचे चे प्राचार्य डॉ. विनीत मत्ते यांची भेट
विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेची तपासणी करून विविध शैक्षणिक उपक्रमाचा घेतला सविस्तर आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. विनीत मते वरिष्ठ अधिव्याख्याता येलगोपवार मॅडम व धनराज येलमुलवार, श्री अमोल बल्लावार विषय सहाय्यकासह दिनांक 18 ऑगस्ट रोजी पीएम श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडचांदूर येथे भेट देऊन शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली
यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती, शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रमातील विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सहभाग याबाबतची पाहणी करण्यात आली.
शाळेतील संपूर्ण भौतिक सुविधा परसबाग खेळाचे मैदान पिण्याच्या पाण्याची सुविधा यासोबतच अंक तर्क समृद्धी कार्यक्रम, वाचनाचा आनंदोत्सव, डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, मूल्यवर्धन कार्यक्रम, विद्धांजली पोर्टल , चावडी वाचन कार्यक्रम, विद्या प्रवेश उपक्रम सेतू, अभ्यासक्रम, मित्र उपक्रम निपुण महाराष्ट्र, या विविध उपक्रमाचे शाळेत प्रत्यक्ष पाहणी करून अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
शासनाकडून पीएमसी शाळांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा योग्य व नियमानुसार वापर होत आहे किंवा नाही तसेच पीएमसी शाळेच्या निर्धारित मानकानुसार कार्यरत आहे किंवा नाही याबाबतही विविध बाबीची तपासणी करण्यात आली. शाळेतील उपक्रमाची पाहणी केल्यानंतर गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक त्या सूचना प्राचार्य डॉ.विनीत मत्ते यांनी दिल्या विशेषता डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवून गणित व विज्ञान विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आव्हान त्यांनी केले.
या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांना विविध शैक्षणिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थ्यांची अध्ययन गुणवत्ता आणि पीएम श्री शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करून एक आदर्श शाळा तालुक्यात निर्माण करण्यासाठी एक नवी दिशा त्यांना मिळाली यावेळी पंचायत समिती कोरपना मधील साधन व्यक्ती उपस्थित होते.



