शरदराव पवार महाविद्यालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा देशभक्तीपर उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती करून नागरिकांना आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. महाविद्यालयाच्या परिसरात तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी प्रा. डॉ . शरद बेलोरकर, प्रा. डॉ. संजय गोरे,डॉ. माया मसराम, डॉ. सतेंदर सिंग, एन. सी. सी. सी. पी. ओ. प्रा. मंगेश करंबे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



