ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोना काळातील थकीत भत्ता तात्काळ देण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच गटप्रवर्तक व अर्धवेळ स्त्रीपरिचर यांचा थकीत कोरोना भत्ता तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटू च्या वतीने करण्यात आली.

प्रलंबित करोना प्रोत्साहन भत्ता 24000₹ मिळावे या मागणीला घेऊन उडानपुल बस्टॅन्ड पासून ते पंचायत समितीपर्यंत करोना भत्ता मिळालाच पाहिजे

असं कसं देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही

करोना भत्ता आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे

लाल बावट्याचा विजय असो

सर्व योजना कर्मचारी एक एकुटीचा विजय असो!

किमान वेतन 30000₹ मिळाले पाहिजे! कामगार कर्मचारी एकजुटीचा विजय असो! नारे देत प्रा. कॉ. रमेशचंद्र दहिवडे किशोर जामदार अरुण भेलके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आले मोर्चा काढण्यात आले. पंचायत समिती कोरपना च्या केबिनमध्ये सभा घेण्यात आली. यावेळी

 शांता मळावी सुनिता सूर काकडे विमलबाई वसाहती उज्ज्वला अंकिता धर्मे सोनाली टोंगे अंगणवाडी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र) यांच्या वतीने गटविकास अधिकारी श्री श्रीकांत बोबडे पंचायत समिती कोरपणा यांना 17 ऑगस्ट 2026 रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून शासनाने प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही हा भत्ता पूर्णपणे मिळालेला नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

कोरोना काळात जवळपास 24 महिने काम करूनही अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांचा सुमारे 23 हजार रुपयांचा भत्ता थकीत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे थकीत कोरोना भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती गुजाबाई डोंगे सचिव प्रा. रमेशचंद्र हडके तसेच सर्व कोरपणा तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच मद तसेच मदतनीस आशा वर्कर तसेच गटप्रवर्तक यांनी कोरपणा बस स्टॅन्ड येथे नारेबाजी करण्यात आली त्यानंतर गट विकास अधिकारी पंचायत समिती कोरपना यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व महिला उपस्थित होते तसेच गट विकास अधिकारी साहेब पंचायत समितीच्या पटांगणास असलेले महिलांना मोर्चेची दखल घेऊन वbdo स्वतः आंदोलन स्थळी येऊन आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली व लवकरात लवकर नियोजन करून तात्काळ हा मार्ग काढू असे आश्वासन bdo साहेबांनी यावेळी दिला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये