ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर येथे शांतता समितीची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 17/08/2026 रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीदरम्यान पोलीस स्टेशन रामनगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच सदर समस्या दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत शांतता समिती सदस्यांकडून सूचना व मते जाणून घेण्यात आली.

आगामी सण व उत्सव शांततेत, सलोख्याने व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पडावेत, यासाठी उपस्थितांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व नागरिकांनी सामाजिक सलोखा व शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

सदर बैठकीस शांतता समिती सदस्य यशवंत झाडे, विशाल हजारे, धर्मपाल ताकसांडे, गोपाल बिरे, संदीप किटे, पंकज खंगार, राजेंद्र कळसाईत, आनंद माशांनी, नितीन कुत्तरमारे, नितीन थूल, अनिल गावंडे, प्रा. विलास भगत, चेतन गुजर, महेंद्र राखुंडे तसेच पोलीस पाटील स्वप्निल कांबळे व सुनीता सवाई उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आगामी सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांनी अफवा अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

              पोलीस स्टेशन रामनगर, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये