ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाखो भाविकांनी घेतले भद्रनाग स्वामींचे दर्शन

नागमंदीर परीसरात चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :- संपुर्ण विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या भद्रावती शहरातील भद्रनाग स्वामी मंदीरात नागपंचमी यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी भद्रनाग स्वामींचे दर्शन घेतले.यावर्षी भाविकांची संख्या नेहमीपेक्षा अधीक होती.यात्रेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व प्रत्येक भाविकाला सहजरीत्या भद्रनाग स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासन, स्थानीक प्रशासन तथा पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यात्रेचे स्वरुप लक्षात घेता भाविकांना मंदीरपरीसरात सहजतेने येता यावे यासाठी मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग गांधी चौका पासुन रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. पहाटे भद्रनाग स्वामींची महाआरती तथा विधीवत पुजन झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.अगदी पहाटेपासून भाविकांनी भद्रनाग स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली.यात विदर्भातील कानाकोपऱ्यापासून आलेल्या भाविकांचा समावेश होता.भाविकांच्या सेवेसाठी शहरातील अनेक संघटननांतर्फे मंदिर परीसरात ऊपवासाच्या खाद्यपदार्थांचे निशुल्क स्टार लावण्यात आले होते.नागपंचमी निमित्त भरणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने मंदीरात विवीध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तर संपुर्ण मंदिर विद्युत रोषणाईने आकर्षक रीत्या सजविण्यात आले.यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदीर परीसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये