एक तास माझ्या शाळेसाठी या उपक्रमातून नांदा शाळेचा कायापालट
माजी विद्यार्थी संघाचा स्वातंत्र दिनी दिमाखदार गौरव सोहळा शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लाखोंची मदत जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा मराठी येथे माजी विद्यार्थी संघ नांदा यांच्यावतीने 4मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत त आयोजित करण्यात आलेल्या एक तास माझ्या शाळेसाठी या अभिनव उपक्रमात माजी विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या उल्लेखनीय* *योगदानाबद्दल शाळेच्या वतीने 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत नांदाच्या सरपंच मा. मेघाताई पेंदोर होत्या तर उद्घाटक म्हणून* *गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा माननीय कल्याण जोगदंड उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य देवरावजी निब्रड शिवाजी विद्यालय राजुरा*, *पुरुषोत्तम आस्वले* *उपसरपंच ग्रामपंचायत नांदा*, *केंद्रप्रमुख पंढरीनाथ मुसळे, मा.डॉ अनिल मुसळे प्राचार्य* *प्रभू रामचंद्र कनिष्ठ* *महाविद्यालय नांदा*, *माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार तथा ग्रामपंचायत सदस्य माननीय रत्नाकर चटप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ गिलबिले ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय हरिदास राऊत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय मुरलीधर बोडके, माजी उपसरपंच माननीय लहुजी गोंडे, माननीय गणेश लोंढे पत्रकार ,मा अभय मनोत सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य नांदा माननीय रवी बंडीवार पत्रकार सकाळ आदी मान्यवर उपस्थित होते*
*माजी विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतही दिले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
*या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी वैशाली तुम्मे यांनी केले. त्यांनी एक तास माझ्या शाळेसाठी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की रखरखत्या उन्हाळ्यातही माजी विद्यार्थी दररोज वेळेवर उपस्थित राहिले आणि शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मोलाचे मार्गदर्शन केले .या उपक्रमामुळे शैक्षणिक उत्साह निर्माण झाला असून शाळेची परसंख्या वाढून यावर्षी 104 झाली आहे .या उपक्रमाची मोठी उपलब्धी असल्याने त्यांनी सांगितले.*
*यावेळी शाळेतील इयत्ता दुसरीतील काव्य हनुमंते या मूकबधिर विद्यार्थिनीच्या गुणवत्तेचा* *विशेष गौरव करण्यात आला काव्य 99 पर्यंतच्या दोन अंकी संख्या ओळखते तसेच बेरीज ही करून दाखवीते. प्रतिकूल परिस्थितीतही इतर* *विद्यार्थ्याप्रमाणे अभ्यासात प्रगती करीत आहे या तिच्या प्रगतीमध्ये काव्याच्या आईचा मोलाचा वाटा आहे विशेष म्हणजे काव्याची आई श्रीमती प्रतीका नंदकिशोर हनुमंते ही सुद्धा मूकबधिर आहे तिचे वडील नंदकिशोर हनुमंते हे सुद्धा मूकबधिर होते. त्यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तिची आई तिच्या* *जडणघडणीत मोलाचा मार्गदर्शन आपल्या मुलीला करीत आहे .याबद्दल शासनाच्या परिपत्रकानुसार उत्कृष्ट मातांचा गौरव करण्यात यावा असे सूचना होत्या.*
*काव्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिका नंदकिशोर हनुमंते या मातेचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. काव्याच्या परिस्थितीची दखल घेत गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सदस्य ग्रामपंचायत नांदा माननीय अभय मनोत यांनी 5000 रु तर माननीय गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड यांनी 1000 रु असे आर्थिक मदत काव्याच्या आईकडे सुपूर्त केली.*
*मा.डॉअनिल मुसळे प्राचार्य प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा यांचेकडून कार्यालयाकरिता चेअर व शिक्षकांसाठी खुर्च्यांची घोषणा केली*
याप्रसंगी या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर अनिल मुसळे प्राचार्य प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा यांनी शाळेच्या ऑफिसकरीता एक चेअर व प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांसाठी एक खुर्ची देण्याचे घोषणा केली . उपस्थितांनी कौतुक केले*
एक लाख तीस हजाराचे इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड देण्याचा माझी विद्यार्थ्यांचा संकल्प करण्यात आला
माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री नितेश मालेकर यांनी संघाचे भविष्याचे विजन मांडताना शाळेच्या डिजिटल विकासासाठी मोठी घोषणा केली. येत्या 26 जानेवारी पर्यंत अंदाजे एक लाख तीस हजार किमतीचा इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड शाळेला देण्यात येईल .तसेच भविष्यात शाळेतील सर्व वर्ग खोल्या इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड ने सुसज्ज करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला
*गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड यांनी माजी विद्यार्थी संघाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की नांदा येथील माजी विद्यार्थी संघ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारा माझे विद्यार्थी संघ म्हणून पुढे येत आहे .याचा आम्हाला अभिमान आहे शाळेच्या मदतीसाठी माजी विद्यार्थी पुढे सरसावत असून गावातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी संघ सक्रियपणे काम करत आहे त्यामुळे येत्या काळात शाळेचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही असे याप्रसंगी त्यांनी सांगितले तसेच शाळेने यावर्षी माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले
*अध्यक्ष मार्गदर्शन करताना सरपंच सौ मेघाताई पेंदोर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले माजी विद्यार्थी संघाच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मुलींचा कबड्डी संघ उपविजेता ठरल्याबद्दल त्यांचे सुद्धा याप्रसंगी कौतुक केले व शाळेच्या प्रगती बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.*
शाळेसाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुरलीधर बोडखे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मे महिन्याच्या सुट्टीतही शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गावातील माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून एक तास माझ्या शाळेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमात सर्व माजी विद्यार्थी वर्गमित्र आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला यासाठी रत्नाकर चटप सल्लागार तथा सदस्य ग्रामपंचायत नांदा श्री गणेश लोंढे पत्रकार तथा सदस्य माजी विद्यार्थी संघ नांदा. श्री सतीश जमदाडे सदस्य माजी विद्यार्थी संघ यांच्यासह सर्व सहकाराचे त्यांनी आभार मानले याप्रसंगी त्यांनी सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्टीतही शाळेतील सर्व शिक्षक नियोजनाप्रमाणे उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केले असे याप्रसंगी सांगितले, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात शाळेतील विद्यार्थी हे मामाच्या गावाला जातात सुट्टीत मौज मजा करतात परंतु शाळेतील सर्व विद्यार्थी पूर्ण वेळ उपस्थित राहिले याचे त्याने विशेष कौतुक केले.
एक तास माझ्या शाळेसाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मार्गदर्शकांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.*
*माजी विद्यार्थ्यी मा.हारून सिद्दीकी यांनी देशभक्ती गीतांची मेजवानी दिली व त्यांच्या देशभक्ती पर गीतांनी विद्यार्थी मंञमुग्ध झाले*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री गोविंद प्रसाद गुप्ता सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कु वैशाली तुम्मे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री भगवान नागरगोजे विषय शिक्षक यांनी केले*
*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती नांदा .माजी विद्यार्थी संघ नांदा. मुख्याध्यापिका कुमारी वैशाली तुम्मे श्री गोविंद प्रसाद गुप्ता सर श्री भगवान नागरगोजे सर श्री गुलाब राठोड सर श्री विनोद किंन्नाके सर व गावातील युवक मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.*
*एक तास माझ्या शाळेसाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
*कार्यक्रम दर शनिवारी सुरू ठेवण्याचा संकल्प*करण्यात आला
*शाळेची पटसंख्या वाढून 104 वरआहे
काव्य हनुमंते चा विशेष गौरव*
*काव्याला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत*देण्यात आली
एक लाख तीस हजार रुपयाचा इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड देण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प आहे
*सर्व वर्ग खोल्या डिजिटल करण्याचे माजी विद्यार्थी संघाचे उद्दिष्ट*आहेत
*माजी विद्यार्थी संघाच्या कार्याचे कल्याण जोगदंड गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून कौतुक करण्यात आले



