नागपंचमीच्या पवित्र पर्वावर रविंद्र शिंदे ट्रस्टव्दारा महाप्रसादाचे वितरण
शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
भद्रावती :- नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त भद्रावतीचे आराध्य दैवत श्री भद्रनाग स्वामी यांच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक-भक्तांसाठी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या श्रद्धा व उत्साहात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाप्रसाद वितरण स्थळी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार करण देवतळे, आमदार किशोर जोरगेवार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंत टेमुर्डे, प्रवीण काकडे, किशोर बावणे यांनी भेट देऊन प्रसाद ग्रहण केला.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती विरुटकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती राजू डोंगे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा चंद्रपूरचे जिल्हा सचिव रमेश मेश्राम, विविध कार्यकारी सहकारी संस्था भद्रावतीचे अध्यक्ष रोहण कुटेमाटे, उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, संजयबाबू उमरे, कृउबास भद्रावतीचे माजी सभापती तथा चिरादेवीचे माजी सरपंच वासुदेव ठाकरे, अशोक निखाडे, पिर्ली सहकारी संस्थेचे संचालक विष्णुदास मत्ते, किशोर गोवारदीपे, अमित गुंडावार, प्रविण ठेंगणे, माजी नगरसेवक प्रशांत डाखरे व प्रशांत झाडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाविक-भक्तांना प्रेमपूर्वक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नागपंचमीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे भाविकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले. श्री भद्रनाग स्वामींच्या कृपेने हा महाप्रसाद वितरण सोहळा अत्यंत आनंद, श्रद्धा आणि उत्साहात पार पडला.



