ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालय वर्धा येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

तहसील कार्यालय वर्धा येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. दीपक कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेले तहसीलदार श्री. संदीप पुंडेकर वर्धा नायब तहसीलदार श्री. अजय धर्माधिकारी निवास नायब तहसीलदार.श्री.संदीप डाबेराव तहसीलदार श्री. संजय चिंगल वार तसेच श्री.अनुप राऊत नायब तहसीलदार नायब तहसीलदार श्री. राम कांबळे मंडळ अधिकारी श्री.रवी अंजारे मंडळ अधिकारी श्री. कुमार बारसागडे आणी तसेच अधिकारी आणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन केले.

व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपस्थित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. स्वतः कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही तसेच कुटुंबीय, मित्र व समाजातील इतर व्यक्तींना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

“व्यसनमुक्त व्यक्ती, व्यसनमुक्त कुटुंब आणि व्यसनमुक्त समाज” या उद्देशाने प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वारसा पुढे नेत सशक्त, निरोगी, व्यसनमुक्त आणि विकसित भारत घडविण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

“स्वातंत्र्याचा मान राखूया,
व्यसनमुक्त समाज घडवूया;
देशासाठी सदैव झटूया,
भारताचा गौरव वाढवूया!”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये