ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालय परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पालक तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप भाऊ गड्डमवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार कोषाध्यक्ष डॉ. विजय शेंडे,सदस्य रवल गड्डमवार उपस्थित होते.

 स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, भारतीय संविधानाची मूल्ये आणि देशाच्या विकासात युवकांची भूमिका याबाबत संदीप भाऊ गड्डमवार अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विजय शेंडे समयोचित मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक धनंजय गुरनले यांनी केले. तर आभार काजल बारापात्रे यांनी मानले.

स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यास विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी पालक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये