ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भाच्या भाविकांसह इतर राज्यातील भाविकांची भद्रनाग स्वामींवर श्रद्धा

नागपंचमीला भद्रावती शहराला येथे जत्रेचे स्वरूप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            विदर्भातील एकमेव असे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पुरातन श्री स्वामी भद्रनागाचे मंदिर नागपंचमी आणि महाशिवरात्री या धार्मिक सणाला या ठिकाणी मोठ्याच यात्रेचे स्वरूप असते. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना व इतर राज्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी हजेरी लावीत असतात. विशेष करून नागपंचमीला भाविकांची हजेरी मोठी असते.

           मंदिराचा परिसर पूजा साहित्यासह वेगवेगळ्या दुकानांनी गजबजलेला असतो. मंदिर व्यवस्थापन कमिटीसह पोलीस विभाग या महोत्सवाच्या काळात भाविकांच्या सेवेसाठी राबत असतात.

*नागपंचमीच्या निमित्ताने असा हा प्रपंच*

             पौराणिक भांदकचे भद्रनाग मंदिर वैरागड च्या नागवंशी राजाचे राज्य दक्षिण- पश्चिमेस भांदक पर्यंत होते. याचा एक पुरावा भांदक येथे आढळतो. भांदकचे प्राचीन नाव भद्रक हे ज्या मंदिरावरुन पडले ते भद्रेश्वराचे मंदिर म्हणजेच भांदक येथे रेल्वे स्टेशनच्या मार्गावर आहे. त्यास हल्ली भद्रनाग असे म्हणतात.

*गावाचे नाव भद्रक पडले*

       श्रीपुर कोसल येथील पांडू वंशीय राजा उदयन याने भद्रेश्वराची स्थापना केली. त्यावरून त्या गावाचे नाव भद्रक असे पडले. भद्रक या नावाचा उल्लेख आठव्या शतकातील गणेश पुरानात आला आहे. कालांतराने हे मंदिर कोसळून त्यातील शिवलिंग व नंदी नष्ट झाले. वैरागड येथील नागवंशीय राजांपैकी एखाद्या राजाने अथवा त्याच्या प्रेरणेने लोकांनी पडक्या मंदिराचा जिर्णोद्धार करून नागाची स्थापना केली.

*भद्रावती परिसरात भद्रनाथ स्वामींच्या अन्य चार भावंडाची वास्तव्य*

          भद्रावतीच्या बद्रनाग स्वामी व्यतिरिक्त या परिसरात चार भावंडाचे वास्तव्य असून श्री स्वामी भद्रनाथ, श्री स्वामी चिंतामणी शेष, श्री स्वामी दुधनशेष, श्री स्वामी बडीनाग शेष व श्री स्वामी नागवेली शेष अशी त्यांची नावे आहेत. श्री भद्रनाथ स्वामींचे मंदिर भद्रावतीच्या प्रमुख मार्गावरील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला आहे. श्री चिंतामणी शेषांचे मंदिर भद्रावती शहराच्या पूर्वेस सुमठाणा गावाजवळ असून पश्चिमेस दुधनशेष स्वामींचे मंदिर असून या ठिकाणी पवित्र व पुरातन दुधाळा तलाव आहे. उत्तरेला चिचोर्डी शिवारात श्री स्वामी नागवेली शेषांचे मंदिर आहे. त्यांना मनाजी बुवा या नावाने सुद्धाओळखतात तर दक्षिणेला सुरक्षा नगर येथे बडीनाग शेषांचे मंदिर असून आता ते मंदिर रस्त्यावर आल्याने त्याच ठिकाणच्या जवळ भद्रावती नगरपालिकेने स्थापन केले आहे. शेकडो वर्षांपूर्वी भांदक नगरीत यौनाश्व राजा होऊन गेलेत. त्यांना मुले बाळ नसल्याने त्यांनी भद्रनाग स्वामींना पुत्र प्राप्तीसाठी साकडे घातले. त्यानंतर राजांना कन्यारत्न जन्माला आले. भद्रनाग स्वामींच्या नावाला अनुसरून राजांनी आपल्या राजकन्येचे नाव भद्रावती ठेवले त्यावरून या नगरीचे नाव भांदक वरून भद्रावती झाले. भद्रानाग मंदिराची वास्तू रचना व भद्रणास्वामींच्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या मंदिराला आधुनिक रूप देण्यात आले.

          या मंदिरात भाविकांना कार्यक्रम घेता यावा याकरिता मंदिराच्या समोरील परिसरात बांधकाम करण्यात आले असून त्या ठिकाणी सभा मंडप तयार करण्यात आला आहे. स्वयंपाक घेऊन येणाऱ्या भाविकांकरिता पाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. भद्रनाग स्वामींची मूर्ती ९ फण्याची असून उंची ३ फुटाहुन अधिक आहे. अत्यंत लोभनीय श्री भद्रनाथ स्वामी ची मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे. याच परिसरात शिवलिंग असून विष्णूची शेषांवर निद्रित अवस्थेत लेटलेली मूर्ती आहे. बाहेरच्या भागात गणपती आणि हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये