
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
श्री राधेश्याम सेवा केंद्र समिती सेवा भावी संस्था यांच्या वतीने ‘आपनों से अपनों की बात’ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व सुप्रसिद्ध व्यक्ती मुरली मनोहर व्यास उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत वकील ॲड. पारोमिता गोस्वामी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी डीन सोमानी, संस्थापक अध्यक्ष निहार हलदार तसेच निधीर हलदार यांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी CET परीक्षेत 99.39 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तसेच नीट परीक्षेतही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मनतोष मुरलीधर सरकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मनतोष यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनतोष यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत इतर विद्यार्थ्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीची प्रेरणा निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



