पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात केला साजरा
नागेशकुमार चतरकर पोलीस निरीक्षक वर्धा यांनी दिली झेंड्याला सलामी..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
भारत देशाला स्वातंत्र्य होऊन ८० वर्ष पूर्ण झालेले आहे या निमित्ताने पोलीस स्टेशन वर्धा शहर च्या परिसरात पोलीस उपनिरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलेले असून या वेळेस उपस्थित असलेले

पोलीस स्टेशन वर्धा शहर चे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामधगे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील राम पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस उपनिरीक्षक परवेज खान व 100अंमलदार यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशन वर्धा शहर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले झेंडा वंदन नागेश कुमार चतरकर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी दिली झेंड्याला सलामी या वेळेस
महिला आणी पुरुष अधिकारी आणी कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन खाऊ वाटप करून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला. राष्ट्रगीत व ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
जय हिंद! 🇮🇳



