“दारुबंदी पथका तर्फे पोलीस ठाणे वर्धा शहर हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करून 2 लाख 1 हजारावर मोहा रसायन सडव्याचा पूलफैल वर्धा येथील मुद्देमाल जप्त करून नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे
दि. 16/08/2026 रोजी पोलीस ठाणे वर्धा शहर परीसरात मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस ठाणे वर्धा शहर यांचे आदेशान्वये वॉश आउट मोहीम राबवीने करीता रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की, पुलफैल वर्धा येथे स्मशानभुमी चे मागे झाडाझुडपामध्ये नाल्याचे काठावर दोन ईसम हे संनमताने गावठी मोहा दारू गाळण्या करीता कच्चा मोहा रसायण सडवा तयार करीत आहे. अशा खात्रीशीर खबरेवरुन पंचासमक्ष पोस्टॉपचे मदतीने त्यांचेवर प्रोरेड केला असता, दोन इसम निळ्या रंगाचे प्लास्टीक ड्रम मध्ये काडी घुसळतांना दिसुन आले. पोस्टॉफ व पंचासह लपत छपत त्यांचे जवळ जात असता त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने मौक्यावरुन दोन्ही ईसम पसार झाले. पोस्टॉफसह त्यांचा पाठलाग केला असता एका ईसमास ताब्यात घेतले व दुसरा ईसम हा नाल्याचे काठाने झाडाझुडपातुन पसार झाल्याने मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या ईसमास मौक्यावर आणुन पंचासमक्ष त्याला त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव बादल राजु रामटेके वय 30 वर्ष , रा. पुलफैल, वर्धा असे सांगीतले. आरोपी बादल रामटेके यास पंचासमक्ष सखोल विचारपुस केली असता, सदरचा कच्चा मोहा रसायण सडव्याचा मुद्देमाल हा पळुन गेलेला ईसम नामे सुरज अरकेल रा. पुलफैल, वर्धा याच्या मालकीचा आहे व मी त्याचेकडे 500/- रुपये रोजमजुरीने दारु गाळण्याचे व कच्चा मोहा रसायण सडवा तयार करण्याचे काम करतो असे पंचासमक्ष सांगीतले. मौक्यावर येवुन पोस्टासह दोन्ही पंचासमक्ष मोक्याची पाहणी केली असता मौक्यावर एकुण जुमला किंमत 2,01,500/- /-रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून मौक्यावर नाश करण्यात आला. पंचनामा कार्यवाही करून नमूद आरोपी यांचे विरुध्द कलम 65 (एफ), 83 म.दा.का. अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही . पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. सुनिल महाडीक, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री. नागेशकुमार चतरकर पोलीस ठाणे वर्धा शहर यांचे निर्देशाप्रमाणे, दारुबंदी पथक प्रमुख पोलीस हवालदार सुहास चांदोरे सहकारी पोलीस हवालदार सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार मनोज काकपुरे, पोलीस अंमलदार नवनित वानखेडे, पोलीस अंमलदार उमेश कुंभरे, महीला पोलीस हवालदार वैशाली करमनकर ही कार्यवाही पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी केली.



