ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलीस स्टेशनमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी येथे भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळी पोलीस स्टेशनच्या परिसरात राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन केले.

या कार्यक्रमास API संदीप काकडे, PSI शिवराज जाधव, PSI अश्विन गजभिये यांच्यासह देवळी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला. राष्ट्रगीत व ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जय हिंद! 🇮🇳

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये