ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा येथे देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.

या प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम, इंजितीत मदने, अभिजीत वाघे, श्रीकांत येवले, विक्रम काटकपुरे, भारत खंडाटे तसेच मुख्य लिपिक श्याम संधरे, वरिष्ठ लिपिक संदीप घोडे, कनिष्ठ लिपिक अमोल रघाटाटे , घनमोडे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये