स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा बाजवणाऱ्या वर्धा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचा मा. पालकमंत्री व पोलिस अधीक्षक यांचे हस्ते सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य आज वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी ८.१५ वाजता झेंडावंदनाचा सोहळा पार पडला त्यावेळी मा. पोलिस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट, आणि कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले त्यात कुप्रसिद्ध गुन्हेगार राकेश उर्फ भुऱ्या सिद्धार्थ जनबंधू (रा. हिंगणघाट) याच्यावर PITNDPS १९८८ अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून त्याला स्थानबद्ध (Detain) करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या खालील अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
1 श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, 2. पोहवा/१३०२ उमाकांत लडके, 3. पोहवा/१४८८ रविंद्र घाटुर्ले, 4. पोअं/१६८३ भारत बुटलेकर, 5 पोअं/९३२ अनंत हराळ 6. पोहवा /१२२५ संतोष वनस्कर सर्व उ.वि.पो. अ कार्यालय हिंगणघाट महापुरात अडकलेल्या नागरिकाचे प्राण वाचविल्याबद्दल सत्कार (पोलीस स्टेशन अल्लीपूर) दिनांक ३०/०७/२०२६ रोजी अल्लीपूर येथील यशोदा नदीला आलेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यात अडकलेले नागरिक श्री अक्षय मनोहर माटे (वय ३२) यांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रभर एन. डी. आर.एफ. (NDRF) पथकासह बचाव मोहीम राबवून नागरिकाचा जीव वाचवणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलाः त्यामध्ये 1. श्रीमती संगीता शंकरराव हेलोंडे, स.पो.नि. 2. श्रीमती वर्षा राजु तांदुळकर, पो.उप.नि. 3. श्री रवि जेठमल वर्मा 4. अजय पांडुरंगजी घुसे, 5. सतिश ताराचंद हांडे, 6. गणेश नामदेवराव कन्नाके, 7. रविंद्र बाळकृष्ण चवडे, 8. प्रमोद सखारामजी डडमल, 9. पंकज रंगरावजी कापसे, 10. नितीश मारोतराव निंदेकर, 11. श्री विठ्ठल संगाजी केंद्र, 12. श्री रुपेश धनराजजी बगवे, सैनिक यांचा समावेश होता
दिनांक ०५/०८/२०२६ रोजी मिळालेल्या माहितीवरून, आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विहिरीत उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचे तात्काळ मोबाईल लोकेशन ट्रेस करून, महाबळा ते कोटंबा फाटा दरम्यानच्या विहिरीतून गावकऱ्यांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढून प्राण वाचवणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाः त्यामध्ये 1. पंकज गजानन वाघोडे, स.पो.नि. 2. जावेद इदरीस धामिया, स.फो. 3. श्री मंगेश ज्ञानेश्वर राऊत, पो. हवा. 4. विनोद पुनाजी कोडापे यांचा समावेश होता



