ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस ठाणे वर्धा (शहर) चे डी.बी. पथकाची कामगिरी जबरी चोरीचा केला गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविनय सादर आहे की, नमुद गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी हे त्यांचे सोबत असलेले नमुद गुन्हयातील जख्मी नामे श्रीबास गौरचंद मंडल वय 51 वर्ष रा मोहननगर, वर्धा असे चहा कॅन्टींगवर चहा पित असतांना तीन अनोळखी इसम तेथे आले व त्यांनी जख्मीला तु बंगाली आहे काय असे म्हणुन त्यांचे हातातील मोबाईल हिसकावुन घेतले व खाली फेकुन फोडुन टाकले क त्यांना हाताबुक्यांने मारहाण करत असतांना फिर्यादी झगडा सोडविण्यास गेले असता त्यांतील एकाने त्याचे हातात असलेला लोखंडी कडा फिर्यादीचे कपाळावर व ओठावर मारले त्यामुळे रक्त निघाले तसेच फिर्यादी यांन रस्ताचे कडेला ओढत घेवुन गेले व फिर्यादी यांचे खिशात असलेले नगदी 720/ रूपये जबरदस्तीने हिसकावुन काढुन घेतले व फिर्यादी यांचे डोळयाचा चष्मा फोडुन टाकला अश्या फिर्यादी यांनी तकार दिल्याने पो.स्टे. ल अप.क. 1324/2026 कलम 309 (6), 3(5) भा.न्या.सं. अन्वये आरोपीतांन विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासाव घेतला.

पोस्टेला गुन्हा नोंद होताच गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन आरोपी मिळुन यावे म्हणुन पोनि नागेशकुमार चतरकर यांनी विशेष पथक नियुक्त करून विशेष पथकाने आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज तपासुन तसेच मुखबिर कडुन मिळालेल्या खात्रीशिर खबरे वरून सदर गुन्हयातील आरोपी 1. साहील वाघ्या सातपुते वय 22 वर्ष 2. सौरभ राजु सातपुते वय 20 वर्ष 3. निखील गोमा गुंजेवार वय 20 वर्ष तिन्ही रा. वड झोपडपटटी, आर्वी नाका वर्धा यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन अटक करून त्यांचा मा. न्यायालयातुन पीसीआर घेवुन तपासादरम्यान आरोपीने गुन्हयात वापरलेली गुन्हयात वापरलेली जुनी वापरती 1. एव निळ्या काळ्या रंगाची हीरो स्प्लेंडर एक्सटीईसी कमांक एम 32 ए.यु. 8539 कि. 60,000/रू 2. आरोपी क. याचे हातातील कडे कि. 50/ रूपये 3. नगदी 720/ रूपये असा जु.कि. 60,770 / रूपयाचा माल जप्त करण्या आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडिक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो.नी. नागेशकुमार चतरकर पो.स्टे. वर्धा शहर, तसेच निर्देर्शाप्रमाणे, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि नंदकिशोर गायकवाड, पोउपनि सुनिल राम, गुन्हे शोध पथकाचे पोहवा /1378 प्रशांत वंजारी, पोहवा /1444 नचे कांबळे, पोहवा/1382 सुहास चांदोर, पोहवा/990 सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार/1599 वैभजाधव, श्रावण पवार / 1342, पोलीस अंमलदार/405 मनोज काकपुरे, पोलीस अंमलदार/269 नवनि वानखेडे, पोलीस अंमलदार /189 उमेश कुभरे, पोलीस अंमलदार / 665 प्रविण मुन, सर्व पोलीस ठाणे वा शहर यांनी केली. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहवा /1378 प्रशांत वंजारी पोलीस ठाणे वर्धा शहर करीत असुन अधिक गुन्हे उघककीस येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये