अंमली पदार्थ विरोधी विशेष तपासणी मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थाचे वाढते प्रमाणावावत गंभीर दखल घेण्यात आली असून विशेषतः युवक वर्ग या घातक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसतो आहे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंवावर आणि समाजावर विपरीत परिणाम होत आहे. अंमली पदार्थाचे सेवन केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडवत नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील चालना मिळत असल्याने वर्धा जिल्हयातुन अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने जिल्हयात वेळोवेळी अंमली पदार्थ विरोधी विशेष तपासणी मोहीम आयोजीत करण्यात येते. त्याअनुषंगाने संपुर्ण जिल्हयात दि. १०.०८.२०२६ ते ११.०८.२०२६ या कालावधीत जिल्हयातील अंमली पदार्थासंबंधी वापर होण्याची शक्यता असणारी निर्जन व संवेदनशिल ठिकाणे तपासणे, अंमली पदार्थ विरोधी कायदयान्वये गुन्हे दाखल असलेले अभिलेखावरील गुन्हेगार तपासणी करण्याचे उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.
त्याअनुषंगाने जिल्हयातील संपुर्ण १९ पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण २२९ निर्जन स्थळे तपासण्यात आली असुन अंमली पदार्थ विरोधी कायदयान्वये गुन्हे दाखल असलेले अभिलेखावरील एकुण १०६ गुन्हेगार तपासण्यात आले. तसेच यादरम्यान गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना मिळुन आल्याने त्यांचेवर एकुण ९ गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर अंमली पदार्थ विरोधी विशेष तपासणी मोहीमेमध्ये उपविभागीय पोलीस अधीकारी, वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव तसेच जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील १९ ठाणे प्रभारी अधिकारी ४० दयम अधिकारी व २५० पोलीस अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखा येथील ३ अधिकारी व २० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमांमुळे अंमली पदार्थ संबंधाने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण झालेला आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर निश्चीतच प्रभावी परीणाम होणार आहे. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा व मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली वरील प्रमाणे विशेष मोहीम राबवुन गुन्हेगार व. गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे.
(विनोद चौधरी), पोलीस निरीक्षक



