ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा येथील गांधी चौकात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष

माजी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा :_ तालुक्यातील ऐतिहासिक गांधी चौकात भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी ठिक ७:३० वाजता ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोहळ्यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमविला.

      यावेळी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला अध्यक्षा निर्मलाताई कुडमेथे, ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. सदानंद लांडे, अॅड. अरुण धोटे, सभापती संतोष इंदूरवार, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, सेवादलाचे अध्यक्ष भाष्कर वाटेकर, दिनकर कर्नेवार, सय्यद सकावत अली, महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्याताई चांदेकर, न प सभापती अनंतकुमार ताजने, अन्नुताई संधु, नगरसेवक एजाज अहमद, ईश्वर ठाकरे, इंदूबाई निकोडे, निताताई बाणकर, मंगला मोकडे, फरीना सय्यद, पोर्णिमा सोयाम, डॉ. उमाकांत धोटे, मधुकर येगीनवार, कृष्णाजी खामणकर, पंढरी चन्ने, विजय वाटेकर, संतोष गटलेवार, कविता उपरे, शरह काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक राव, अभिजीत धोटे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अॅड. प्रशांत अटाळकर, धनराज चिंचोलकर, वामन वाटेकर, प्रा. रामनंदेश्वर गिरटकर, समाजसेवक छोटुलाल सोमलकर, संदेश करमनकर, माजी नगरसेवक दीपा करमनकर, सुमित्राबाई कुचनकर, भुषण बानकर, अशोक चैनानी, मतीन कुरेशी, सय्यद साबिर, रईस अहमद, सरवतउल्ला बेग, जाणी बेग, मुजीब बेग, शेख मजिद यांसह राजुरा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये