भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथे साजरी
श्रीमती स्नेहा मेंढे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी फोटोला पुष्पहार वाहून आंदराजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 2/10/2026 रोजी भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जन्म होऊन 157 वर्ष पूर्ण झालेले आहेत व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जन्म होऊन 122 वर्ष पूर्ण झालेले आहेत यानिमित्ताने संपूर्ण भारतभर यांच्या जन्म उत्सव साजरा करण्यात येत असतो यानिमित्ताने वर्धा जिल्हात राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथे सुध्दा राष्ट्रपिता महात्मा गांधीं व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथील राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्नेहा मेंढे यांनी महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली व सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा सौरव सातव आणि सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा संदिप मुखे व मोटार वाहन निरीक्षक राज्य परिवहन कार्यालय वर्धा यांनी सुध्दा महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि महात्मा गांधीं यांची 157 वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीं व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथील अमोल रघताते कनिष्ठ लिपिक रितेश दांडेकर कनिष्ठ लिपिक संदिप घोडे वरिष्ठ लिपिक इंगोले बाबू व राज्य परिवहन कार्यालय वर्धा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



