ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन NCCच्या छात्र सैनिकांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, पर्यवेक्षक श्री. एम. एच. चांभारे, कॅप्टन सरोज शिंगाडे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

“एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत NCC छात्र सैनिकांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि महात्मा गांधींच्या विचारांबद्दल जनजागृती करण्यासाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासोबतच “Waste to Best Art” या सर्जनशील स्पर्धेत टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त व आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या.

स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी NCC छात्र सैनिकांनी वॉकॅथॉन रॅलीचे आयोजन केले. विविध घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छता राखण्याचे, पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमातून महात्मा गांधींचे स्वच्छता, स्वयंशिस्त, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचे आदर्श प्रभावीपणे अधोरेखित झाले.

कॅप्टन सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमात ३५ NCC छात्र सैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये