ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनाला गोंडपिपरी पोलिसांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान, अमूल्य जीवन वाचविण्यासाठी करा रक्तदान” या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या परिसरात १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. स्वातंत्र्यदिन हा देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावण्याचा सामाजिक उपक्रम पोलिस विभागाने हाती घेतला आहे.

अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण तसेच विविध वैद्यकीय उपचारांमध्ये रक्ताची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान करावे आणि ‘रक्तदान—जीवनदान’ या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये