ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूरवरून वर्ध्यात होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक सेवाग्राम पोलिसांकडून उद्ध्वस्त

१६ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सेवाग्राम पोलिसांनी पवनार येथील बस स्टँडसमोर सापळा रचून नाकेबंदी करत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख रुपये किमतीची हुंदाई क्रेटा कार, देशी-विदेशी दारूचा साठा आणि मोबाईल असा एकूण १६,१३,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दिनांक ११/०८/२०२६ रोजी रात्री ११:५० वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलिसांना माहिती मिळाली की, नागपूरवरून एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू वर्ध्यामध्ये विक्रीसाठी आणली जात आहे. या माहितीवरून पोलीस स्टेशन सेवाग्रामचे ठाणेदार श्री. देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप व त्यांच्या पथकाने मौजा पवनार येथील बस स्टैंडसमोरील रस्त्यावर त्वरित नाकेबंदी केली. नाकेबंदीदरम्यान संशयित हुंदाई क्रेटा कार (क्रमांक MH 49 BR 9994) अडवून पाहणी केली असता, कारमध्ये बेकायदेशीररीत्या दारूचा साठा त्यात २८ पेट्यांमध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या किंमत ₹३,७३,६००/-, २ मोबाईल फोन किंमत र १,४०,०००/-, हुंदाई क्रेटा कार किंमत ₹११,००००० एकूण जप्त मुद्देमाल १६,१३,६००/- (सोळा लाख तेरा हजार सहाशे रुपये) जप्त केला. सदर प्रकरणी आरोपी इरफान कलीम तगाले वय २३ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १७, स्टेशन फैल, वर्धा, आदील इस्राईल शेख वय २६ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १७, स्टेशन फैल, वर्धा यांना अटक करून आरोपींविरुद्ध सेवाग्राम पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (वर्धा) श्री. सुनील महाडिक यांच्यानिर्देशाप्रमाणे, तसेच ठाणेदार श्री. देवेंद्र ठाकूर, पो.उ.नि. शैलेश जगताप, स. फौ.सतीश दरवरे, पो.ह.वा. संदीप मेंढे, जितकुमार तिवारी, पो.शि. अक्षय गुडाफे पो.ह. वा. विलास लोहकरे आणि पो.ह.वा. नितीन राजपूत यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये