रोठा लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 15 जुलै सायंकाळी सावांगी पोलिस ठाणे हद्दीत मुक्काम पोस्ट रोठा तालुका व जिल्हा वर्धा या ठिकाणी शेतातील घरात बारा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती.त्याबाबत सावंगी पोलीस ठाणे गु र क्र 583/26 कलम 103(1) 64(1) 66 332(बी) बी एन एस व पोस्को कलम 4,8,10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यामध्ये राहुल राजू मडावी वय 30 राहणार रोठा याला वर्धा पोलिसांनी अटक केली होती.सदरचा गुन्हा हा बाललैंगिक अत्याचार व खुना सारखा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलिस अधीक्षक वर्धा सौरभ कुमार अग्रवाल यांनी तात्काळ विशेष तपास पथक उपविभागीय पोलीस अधिकारी,वर्धा विभाग सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आले होते.या संपूर्ण तपासावर अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांची दैनंदिन देखरेख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दिनांक 12 ऑगस्ट रोजी या गुन्ह्याचे आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.
सुनील महाडिक, पोलीस उपाधीक्षक वर्धा विभाग वर्धा



