गायमुख–खापरी रस्त्याची दुरवस्था; शासनाचे दुर्लक्ष
विद्यार्थ्यांना गाडी ढकलण्याची वेळ.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : गायमुख ते खापरी या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहनांना वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. गाडी रस्त्यात बंद पडल्यास शाळेतील विद्यार्थ्यांनाच गाडीला धक्का मारण्याची वेळ येत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गायमुख–खापरी मार्गाची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व पालकांकडून होत आहे. शासन व संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



