घोसरीचे पोलीस पाटील भानुदास कुळमेथे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रवती :_ घोसरी येथील पोलीस पाटील भानुदास कुळमेथे (वय ५९) यांचे बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते घरी झोपेत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
भानुदास कुळमेथे यांच्या पश्चात पत्नी व भाऊ असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच घोसरी गावावर शोककळा पसरली.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मत्ते, तालुकाध्यक्ष राजेश पोईनकर, भद्रावती पोलीस ठाण्याचे एएसआय भारत सोयाम यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. पोलीस पाटील संघटनेच्या प्रचलित पद्धतीनुसार मृतकाच्या पत्नीला पाच हजार रुपये रोख मदत देण्यात आली.
भानुदास कुळमेथे यांनी पोलीस पाटील म्हणून बजावलेल्या सेवेमुळे त्यांचा गावातील नागरिकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने घोसरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



