ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम’ उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन, पाणीपुरवठा आणि संरक्षण करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईने नटलेला आणि पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. सचिन यनगंदलवार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये