ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव पोलिसांतर्फे आर. के. कनिष्ठ महाविद्यालयात ‘सायबर जनजागृती’ व ‘अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र’ कार्यशाळा संपन्न

६५० विद्यार्थ्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव अंतर्गत आज, दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजता आर. के. कनिष्ठ महाविद्यालय, नाचणगाव रोड, पुलगाव येथे ‘सायबर जनजागृती मोहीम’ व ‘अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत एका विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते सायबर गुन्हे आणि युवा पिढीतील व्यसनाधीनता रोखण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली.

या कार्यशाळेत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी नाशिक येथील सायबर तज्ज्ञ श्री. तन्मय दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फ्रॉड, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, पासवर्ड सिक्युरिटी आणि विविध सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयी अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा दरम्यान पोलिस स्टेशन चे ठानेदार श्री सदाशिव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत ‘अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियाना’बाबत सविस्तर माहिती दिली. याशिवाय खालील महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेः

व्यसनमुक्तीः अमली पदार्थांच्या आहारी न जाता निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचे महत्त्व.

सायबर फसवणूक : ऑनलाईन आर्थिक फसवणूक (Financial Cyber Fraud) झाल्यास तात्काळ मदत मिळवण्यासाठी १९३० या टोल-फ्री क्रमांका वर काल करावा व फसवणुकीबाबत माहिती द्यावी.

डायल ११२: कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी पोलिसांची त्वरित मदत मिळवण्यासाठी ‘डायल ११२’ या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर कसा करावा.

वाहतूक नियमः रस्ता सुरक्षा, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन.

पोक्सो कायदा (POCSO Act): बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याबाबत जनजागृती आणि सुरक्षा उपाय याची माहितीदेण्यात आली तसेच १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करण्याबाबत माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेला आर. के. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील ६५० विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये