चोरीतील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीला परत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्र. 716/26 मधील प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर फिर्यादीला परत करण्यात आला.
या प्रकरणातील फिर्यादी सौ. बेबी लक्ष्मण कोराटे, रा. स्टेशनफैल, वर्धा यांना न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून गुन्ह्यातील ६ ग्रॅम सोने, ३६० ग्रॅम चांदी तसेच रोख ५२ हजार ८०० रुपये, असा एकूण मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
हा मुद्देमाल वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चाटकार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन प्रक्रियेनंतर फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीस गेलेल्या मालमत्तेचा परतावा मिळाल्याने फिर्यादीने समाधान व्यक्त केले.
अप क्रमांक 716/26 कलम 305a,331(3),3(5) मधील फिर्यादी सौ बेबी लक्ष्मण korate राहणार स्टेशन फैल यांना वि.कोर्ट मधून आदेश प्राप्त करून गुन्ह्यातील 6 ग्राम सोने,360 ग्राम चांदी आणि नगदी 52,800/- रु चे किंमती मुद्देमाल सुपूर्त करण्यात आला आहे.



