ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य टिळक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची आमसभा उत्साहात संपन्न

पालक-शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे पालक-शिक्षक संघाची आमसभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, नियमित उपस्थिती तसेच सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आमसभेच्या अध्यक्षपदी पालकांमधून श्री. बलराम अयानी यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी श्री. प्रांजल देशकर यांनी कार्यभार सांभाळला. पालक-शिक्षक संघाचे सचिव म्हणून श्री. कानकाटे सर, सहसचिव म्हणून पालक प्रतिनिधी सौ. सुवर्णा ताई लोखंडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हर्षल नगराळे उपस्थित होते. आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजपुरोहित सर यांनी उपस्थित पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. जहागीरदार सर, पर्यवेक्षिका सौ. देगमवार मॅडम, पर्यवेक्षक श्री. पदलमवार सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
सभेदरम्यान मिडल स्कूल विभागातून सौ. सावसाकडे मॅडम, हायस्कूल विभागातून सौ. गौरशेट्टीवार मॅडम आणि कनिष्ठ महाविद्यालय विभागातून श्री. गहाणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या मेहनतीचा उल्लेख करून पालकांनी शिक्षकांचे आभार मानले. काही पालकांनीही आपली मनोगते व्यक्त करत विद्यालयाच्या शैक्षणिक व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पालकांनी शाळेला सहकार्य करावे तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व गरजा याबाबत पालक-शिक्षकांनी सातत्याने संवाद साधावा, असा सूर सभेत व्यक्त झाला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर संचालन कु. शेंडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. डोर्लीकर मॅडम यांनी केले. पालक-शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आमसभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये