ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेच्या डिझेल खर्चात आर्थिक गैरव्यवहारचा आरोप 

समाधान मिसाळ यांनी केली चौकशीची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या शासकीय रुग्णवाहिकेच्या डिझेल वापराबाबत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते समाधान मिसाळ यांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, बुलढाणा यांच्या कडे लेखी निवेदन देऊन केली आहे

शासकीय रुग्णवाहिका ही ग्रामीण भागातील रुग्णासाठी जीवनवाहिनी मानली जाते, रुग्णांना तात्काळ रुग्णालयात पोहोचण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो, या रुग्णवाहिकेवर दाखविलेला डिझेल खर्च व प्रत्यक्ष झालेल्या फेऱ्या यात तफावत आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यासाठी रुग्णवाहिकेचे लागबुक, डिझेल खरेदी च्या पावत्या, किलोमीटर च्या नोंदी, वाहनाच्या फेऱ्या च्या नोंदी, याची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे,चौकशीमध्ये शासकीय निधी चा गैरव्यवहार झाला असल्यास दोषी व्यक्ती वर फौजदारी खटला दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाधान मिसाळ यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये