ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार परिसर येथे आज जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्षा सरस्वती टेकाळे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री बळीराम मापारी व डॉ किरण गिते मॅडम, होत्या , यावेळी महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी सौ.भागुबाई कोल्हे , सोळंके ताई, शांतिलाल निरफळे,बाबुलाल शिवरकर,वशीम शहा उपस्थित होते श्री.शांतिलालजी निरफळे यांनी आदिवासी जीवनावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद बोरकर यांनी केले शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये