ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालय समोर मोटरसायकल स्वरांचा अपघात

सैनिक कन्येच्या सतर्कतेमुळे दोन जीव सुरक्षित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा चिखली रोड वरील समर्थ कृषी महाविद्यालया समोर दि ८ ऑगष्ट रोजी सायंकाळीसात वाजे दरम्यान मोटरसायकल अपघातात दोन जण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते.त्यांना कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते.अशावेळी त्याच रस्त्यावरून जात असलेल्या सैनिक कन्या गायत्री भीमराव चाटे हिने तातडीने ॲम्बुलन्स ला फोन लावला व अपघाताची माहिती दिली . घटनास्थळावरून ॲम्बुलन्स द्वारे देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी आणले सैनिक कन्येच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्ताला तातडीची मदत मिळाली आणि त्यांचे जीव वाचले.सैनिक कन्या गायत्रीचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

        रस्त्यावर अपघात घडला की हात लावू का नका? आपल्याला काय घेणं देणं ? उगाच कशाला मधात पडायचे ?पोलीस पाहत बसतील? असे विचार करणारे अनेक जण असतात. परंतू थोडं विचार करा की याच जागी आपण पडलो ; अन वाचवा वाचवा मदत करा असे म्हणत असू तर हाच विचार करून बघणारे पुढे निघून गेले आणि मदत नाही केली तर आपणही जीवाला मूकू शकतो .आपल्या लहानशा मदतीमुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचू शकतो असा विचार समर्थ महाविद्यालयासमोर रस्त्याने जाणाऱ्या सैनिक कन्या गायत्री भिमराव चाटे हिच्या मनात आला आणि तिने तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली ॲम्बुलन्स ला फोन केले आणि घटनास्थळावर अंबुलन्स ला बोलऊन घेतले.

     देऊळगाव राजा चिखली रोड वर समर्थ कृषी महाविद्यालया समोर दोन मोटर सायकल स्वार पुंजाराम काकडे राहणार मेहुना राजा व जुम्मेखा पठाणराहणार सिनगाव जहाँगीर हे रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडले असताना जवळ कोणी थांबत नव्हते अशावेळी सैनिक कन्या गायत्री भीमराव चाटे हिने तत्काळ फोन करुन ॲम्बुलन्स बोलवली ॲम्बुलन्स चालक आघाव हे ॲम्बुलन्स घेऊन आले.दोन जखमीला ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे प्रथम उपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

       अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या देवदूत सैनिक कन्या गायत्री भीमराव चाटे हिने वडीलाप्रमाणे मुलीने वारसा सांभाळला आहे असेचअसे म्हणत उपस्थित पत्रकार डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी गायत्रीचे अभिनंदन केले.

    पुंजाराम काकडे व जुम्मेखा पठाण यांच्या परिवारांनी सुद्धा तत्काळ सेवा मिळाल्याबद्दल आघाव ॲम्बुलन्स व गायत्री चे आभार मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये