आर्वीत जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
लाठी पोलिसांची यशस्वी कारवाई ; जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी येथे लाठी पोलिसांनी आज ( दि. ८ ) धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्वी परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लाठी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी जुगार खेळत असलेल्या राहुल अंबादास खोब्रागडे (४० वर्षे), सचिन दामोदर मोरे (३४ वर्षे), बालकिसन खुशाल जेउरकर (४१ वर्षे), प्रकाश महादेव आत्राम (३० वर्षे), ताराचंद प्रभाकर अलोने (५९ वर्षे), संतोष मारोती मडावी ( ४६ वर्षे), दशवंत धोंडुजी जीवतोडे (५९ वर्षे) अशा सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे लाठी परिसरात अवैध जुगार अड्डे खेळणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. जुगारासह इतर अवैध धंद्यांविरोधातही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींकडून जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्य, चार मोबाइल (अंदाजित किंमत २१ हजार रुपये) व २,२२० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते, पोहवा अशोक मंजुळकर, पोअ. चेतन झाडे, विलास जाधव, कुणाल पुसाम, महिला पोअ अनुराधा काळे यांनी केली.



