ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत संत गोरोबा काका यांच्या जीवनकार्यावर नाट्य निर्मितीचा शुभारंभ

ग्रामोद्योग संघ येथे स्क्रिप्टचे विधिवत पूजन : नवोदित स्थानिक कलाकारांना मिळणार संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        संत गोरोबा काका यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य व चित्रपट निर्मितीचा शुभारंभ रविवारी (दि. ९) ग्रामोद्योग संघ येथे करण्यात आला. यावेळी नाट्य व चित्रपटाच्या स्क्रिप्टचे विधिवत पूजन करून कलाकारांना स्क्रिप्टचे वितरण करण्यात आले.

संत गोरोबा काका यांच्या जीवनकार्याचा, विचारांचा आणि सामाजिक संदेशाचा प्रभावीपणे प्रसार व्हावा, या उद्देशाने या नाट्य व चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या निर्मितीत भद्रावती व परिसरातील नवोदित तसेच स्थानिक कलाकारांना संधी देण्यात येणार आहे.

यावेळी उपक्रमाचे मुख्य प्रायोजक व लेखक शंकर राणा वाणी, विशाल गावंडे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी आणि प्रकाश श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्य व चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश खातखेडे पार पाडणार आहेत.

कार्यक्रमाचे संचालन बोंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश खातखेडे यांनी केले.

स्थानिक कलाकारांच्या सहभागातून साकारण्यात येणाऱ्या या नाट्य व चित्रपट निर्मितीमुळे भद्रावती परिसरातील नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. संत गोरोबा काका यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा संदेश कलात्मक माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये