स्वातंत्र्यदिनानिमित्त गोंडपिपरीत भाजपची ‘भव्य तिरंगा यात्रा’
आमदार देवराव भोंगळे राहणार उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोंडपिपरी शहरात रविवार, १० ऑगस्ट रोजी ‘भव्य तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला आमदार देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या भव्य तिरंगा यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला अभिवादन करावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, महिलाध्यक्षा स्वाती वडपल्लीवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष राकेश पूण, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



