जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळातर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ, गवराळा यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, हक्क आणि योगदानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच समाजातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक आनंदराव पाटील बदखल, शामराव खापणे, उद्धवराव निळे , रमेश खातखेडे यांच्यासह कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचे सर्व ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तसेच कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि समाजातील सर्व घटकांच्या सन्मानाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



