ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते अशा ठिकाणी DRUGS FREE WARDHA या अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात येत असून सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, व्यसनमुक्ती केंद्र व त्याचे प्रमुख, अशासकीय संस्था (NGO) यांना सहभागी करून घेण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्याला आणि राज्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः युवकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन

अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस विभागाला कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभागासोबत नागरिक, पालक, शिक्षक, युवक व सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

“अमली पदार्थांना नाही म्हणा… स्वतःचे आणि समाजाचे भविष्य सुरक्षित करुया!”

“Drugs Free Wardha घडवुया”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये