ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीमेस व्यापक स्वरुपात सुरवात…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हामध्ये अंमली पदार्थांच्या अवैध विक्री, वाहतूक व सेवनास आळा घालण्यासाठी शासनाचे तसेच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यासंबंधाने पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे दि.07/08/2026 रोजी 11.00 वा. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील अमली पदार्थ विरोधी पथक यांची विडिओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक आयोजीत करुन त्यामध्ये 01 जानेवारी 2026 ते 31 जुलै 2026 पावेतो केलेल्या कार्यवाही संबंधाने आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे अमली पदार्थाचे गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

पोलीस अधीक्षक वर्धा, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री व तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. निर्जन स्थळांची तपासणी, संशयित/संवेदनशिल ठिकाणांची तपासणी, गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई, नाकाबंदी तसेच अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

अमली पदार्थाच्या (NDPS) वाढत्या धोक्यांविरुद्ध व्यापक लढा देण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स’ (ANTF), महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यभरात वर्षभर व्यापक नशामुक्ती जनजागृती अभियान राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आलेल्या जुलै २०२६ ते जून २०२७ या १२ महिन्यांच्या कालावधीसाठी विशेष “वार्षिक उपक्रम दिनदर्शिका” (Theme Calendar) चे अवलोकन करुन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर दिनदर्शिकाप्रमाणे कार्यक्रम राबविणेबाबत मा. पोलीस अधीक्षक वर्धा यांनी मार्गदर्शन केले.

वर्धा जिल्ह्याला अमली पदार्थ मुक्त करणे तसेच त्यावर प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन स्तरावर अमली पदार्थ विरोधी कृती पथक स्थापन करण्यात आले असून सदर पथकामार्फत अमली पदार्थाचे सेवन तसेच बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात अमली पदार्थांची खरेदी विक्री (व्यापार) करणाऱ्या टोळी विरुद्ध MCOCA कायद्यान्वये कारवाई करण्यात येत असून सध्या पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एका टोळीतील ०६ आरोपीविरुद्ध MCOCA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे तसेच अमली पदार्थ गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत कठोर पिट NDPS ची कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली आहे.

वर्धा जिल्हा पोलिस दलाकडून अमली पदार्थाचे वाढते प्रमाण यात गंभीर दखल घेण्यात आली असून विशेषतः युवक वर्ग या घातक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर विपरीत परिणाम होत आहे. अमली पदार्थाचे सेवन केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवत नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील चालना देत असल्यामुळे अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानांतर्गत DRUGS FREE WARDHA मोहिमेची सुरुवात वर्धा जिल्ह्यात दि. ०१/०४/२०२६ रोजी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये