ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोजोली मक्ता येथील जिल्हा परिषद शाळेला गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांची आकस्मिक भेट

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :- तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोजोली मक्ता येथे गोंडपिपरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर आणि धाबा केंद्राचे केंद्रप्रमुख शेखर मेश्राम यांनी आज आकस्मिक भेट दिली.

भेटी दरम्यान शाळेत घेत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याच प्रकारच्या सहशालेय उपक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केले .तसेच शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर पाहून स्तुती केली.

मागील सत्रात शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल बारा विद्यार्थी पात्र ठरल्याने, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी मुख्याध्यापकासह शिक्षक वृंदांचे तोंड भरून कौतुक केले आणि अशीच प्रगती करावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्यांशी हितगुज साधून शैक्षणिक प्रगती पाहिली आणि समाधान व्यक्त केले.

विविध शैक्षणिक घडामोडी, निपुण महाराष्ट्र, पावसाळा सुरू असल्याने घ्यावयाच्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी, वृक्षारोपण, स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा तसेच अनेक विषयांबद्दल शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्याशी चर्चा घडवून पुढील उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक मुरलीधर सरकार , विषय शिक्षक जतीन धोटे, भावेश विश्वास, साधना उराडे यांसह शाळेतील सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये