ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जि.प. प्राथमिक शाळा, बोर्डा झुल्लूरवार येथे विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सरपंच सौ. संगीता गव्हारे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. राकेश गव्हारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व समजावून सांगत नोटबुक व पेनचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे, आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविभाऊ गेडाम, ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्धन सातपुते, ग्रामविकास अधिकारी श्री. कडूकर, शालिकजी रामटेके, मुख्याध्यापक श्री. गोवर्धन सर, शाळेतील शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये