ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगणात घरफोडी करून पळणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडणाऱ्या वडनेर पोलिसांचा तेलंगणा पोलीस महासंचालकांकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :- तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व वारंगल जिल्ह्यात घरफोडी व गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या सराईत दरोडेखोरांचा अत्यंत धाडसाने पाठलाग करून त्यांना जेरबंद करणाऱ्या वडनेर पोलीस ठाण्याच्या (जि. वर्धा) पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सी. व्ही. आनंद (IPS) यांनी प्रशस्तीपत्र देऊन वडनेर पोलिसांचा गौरव केला आहे.

दिनांक २५ मे २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व वारंगल येथून घरफोडी करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक MH 45 L 0921) आरोपी राष्ट्रीय महामार्ग ४४ (NH-44) ने नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती मिळाली होती.माहिती मिळताच वर्धा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार, वडनेर पोलिसांनी दारोडा टोलनाक्यावर तात्काळ नाकाबंदी केली. संशयित वाहन टोलनाक्यावर आले असता पोलिसांनी बॅरिकेट्स लावून ते अडवले. पोलिसांना पाहून चालकाने भरधाव वेगाने गाडी रिव्हर्स घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वडनेर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता, धावत्या गाडीची काच फोडून आत प्रवेश केला आणि आवश्यक त्या बळाचा वापर करून ३ सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेतले. १. प्रेम शालीकराम खत्री वय ३५ वर्षे, रा. नवकन्या नगर, , पारडी, नागपूर, २. सत्येंद्र राजबहादूर गुप्ता वय ४० वर्षे, रा. आजरी माजरी, यशोधरानगर, नागपूर, ३. जयचंद गोकुलचंद गुप्ता (वय २८ वर्षे, रा. त्रिलोकपुरी, दिल्ली ईस्ट, सदर आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, चेन स्नॅचिंग, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तेलंगणातील आदिलाबाद वन टाऊन, काजीपेठ, सुभेदारी व कामारेड्डी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने: ३३१.९०० ग्रॅम, चांदीचे दागिने: ७१८.७०० ग्रॅम, नगद रक्कम: ₹१५,२००/- सह गुन्ह्यात वापरलेली १ स्विफ्ट डिझायर कार (MH 45 L 0921), ४ मोबाईल फोन, लोखंडी रॉड, ड्रिलिंग रॉड, कटर असा मुद्देमाल जप्त केला

वडनेर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान, शौर्य व आंतरराज्यीय सहकार्यामुळे तेलंगणातील अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल झाली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक सी. व्ही. आनंद (IPS) यांनी सपोनि घनश्याम पाटील ठाणेदार, पो.स्टे. वडनेर. पो. उप नि भारतकुमार वर्मा, पोलिस अंमलदार प्रशांत भाईमारे,समीर कामडी, संदीप बदकी यांना प्रशस्तीपत्र (Appreciation Certificate) देऊन सन्मानित केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये