शैक्षणिक साहित्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य शालेय साहित्य वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- विकासपुरुष, लोकनेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळोधी येथे आज (३१ जुलै) शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन आणि खाऊचे वाटप करत एक आदर्श आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर गीत गाऊन सुधीरभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भंगाराम तळोधी निवासी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार आणि वैष्णवी बोडलावार या दाम्पत्यांकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे, हा मुख्य उद्देश समोर ठेवून, वाढदिवस हा केवळ आनंदाचा सोहळा न राहता समाजातील वंचित घटकांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी स्मितहास्य बघून पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
सुधीरभाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरिता “शैक्षणिक साहित्य वाटप” कार्यक्रमाप्रसंगी बोडलावार दांपत्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसरपंच सुनील धाबर्डे, ग्रामपंचायत सदस्य मनोज सिडाम, नम्रता बारसागडे, गीता बुर्रीवार, माजी उपसरपंच मारोती अम्मावार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विजय पेरकावार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुनील रामगोनवार, तसेच शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



